३०० ते ४०० रुपये उकळले जात असल्याचा आरोप,
वयोवृद्ध महिला पुरुषांना उद्धटपणाची वागणूक
पैठण, (प्रतिनिधी) राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी प्रवासासाठी विविध सवलत घेण्यासाठी १ ऑगस्ट पासून लागू होणार आहे. या पार्श्वभूमीवर पैठण तालुक्यातील ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि दिव्यांग लाभार्थी यांच्या कडून स्मार्ट कार्ड ला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे.
पैठण येथील बस स्थानकात स्मार्ट कार्ड काढण्यासाठी ज्येष्ठ महिला पुरुष, विद्यार्थी, दिव्यांग व्यक्ती गर्दी करताना दिसत आहे. परंतु येथील बस स्थानकात स्मार्ट कार्ड काढण्यासाठी येणाऱ्या वयोवृद्ध महिला पुरुषांना येथील सर्विस सेंटर चालका कडून उद्धटपणाची वागणूक दिले जात असून त्यांच्याकडून स्मार्ट कार्ड साठी २५० ते ३००
रुपये उकळले जात असल्याचा प्रकार राजरोष पणे सुरू आहे.
वास्तविक पाहता स्मार्ट कार्ड साठी राज्य परिवहन महामंडळाने १९९ रुपये दर निश्चित केलेले आहे असे असताना या सर्विस सेंटर चालकाकडून नागरिकांची लुटमार केली जात आहे. या संदर्भात काही नागरिकांनी जाब विचारला असता मी काय फुकट सेवा द्यायला बसलो आहे का ? मशीन चा खर्च नाही का, दुकानाचे भाडे आहे, तुमची हमाली करण्यासाठी बसलो आहे का असे उद्धट पणाचे उत्तर देत असून या ठिकाणी विद्यार्थ्यांना, नागरिकांना भर उन्हात रांगा लावाव्या लागत आहे. नागरिकांना ऊन पावसा पासून संरक्षण मिळावे यासाठी कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही.
-- खाजगी दुकानात हजारो कार्ड पडून --
संबंधित सर्विस सेंटर चालकाला बसस्थानक मध्ये नागरिकांना स्मार्ट कार्ड देण्याची जागेची व्यवस्था करण्यात आलेली आहे. असे असताना संबंधित सर्विस सेंटर चालक हा नागरिकांना बस स्थानक पासून लांब असलेल्या पटेल कॉम्प्लेक्स मधील तुलसी लेडीज हब या आपल्या दुकानात येऊन स्मार्ट कार्ड घेऊन जा असे उत्तर देत आहे याठिकाणी आलेल्या नागरिकांना तुमचे कार्डआले आहे या साठी तुम्हाला पुन्हा ५० रुपये द्यावे लागेल असे सांगून जास्तपैसे उकळत आहे. यामुळे वयोवृद्ध नागरिकांना जाण्याचा येण्याच्या त्रास सह आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे या ठिकाणी नागरिकाकडून तो अडीचशे ते तीनशे रुपये स्मार्ट कार्ड साठी उकलत असून नागरिकांची लूटमार करत आहे.
-- खाजगी दुकानात हजारो स्मार्ट कार्ड पडून --
नागरिकांना स्मार्ट कार्ड उपलब्ध करून देण्यासाठी बस स्थानकात व्यवस्था करण्यात आलेली असताना संबंधित सर्विस सेंटर चालक यांनी तुलसी लेडीज हब आपल्या खाजगी दुकानात तयार होऊन आलेले हजारो स्मार्ट कार्ड ठेवले असून या ठिकाणी तो नागरिकांची लुटमार करत आहे.
-- जुने तहसील कार्यालय येथेही स्मार्ट कार्डसाठी लुटमार --
एसटीचे स्मार्ट कार्ड देण्यासाठी भाजी मार्केट जवळील जुन्या तहसील कार्यालयात सुद्धा सर्विस सेंटर उघडण्यात आले असून या ठिकाणीही नागरिकाकडून स्मार्ट कार्ड साठी तीनशे ते चारशे रुपये उकळले जात आहे. या गैरप्रकारची परिवहन महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सखोल चौकशी करून यांचे परवानेत रद्द करावे अशी मागणी केली जात आहे. जास्त पैसे घेणाऱ्याची तक्रार करा.
- आगार प्रमुख मडके
एसटीच्या स्मार्ट कार्ड साठी महामंडळाने १९९ रुपये निश्चित केलेले आहे यापेक्षा जास्त रक्कम कोणी घेत असेल तर त्याची तक्रार करावी त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल अशी प्रतिक्रिया सांजवार्ताशी बोलताना आगार प्रमुख गणेश मडके यांनी दिली. फोटो १ स्मार्ट कार्ड काढण्यासाठी उभे असलेले महिला पुरुष विद्यार्थी. २ सर्विस सेंटर चालकाने खाजगी दुकानात ठेवलेले स्मार्ट कार्ड.